महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेवारस मृतांच्या अस्थीचे पूजन करुन विसर्जन, राष्ट्रीय कला अकादमी न्यासचे सलग ११वे वर्षे - पुणे बातमी

राष्ट्रीय कला अकादमी न्यास व पुणे महानगरपालिका ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय दरवर्षी बेवारस मृतांच्या अस्थीचे विसर्जन करते. यावर्षी ५ मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्या विसर्जित करण्यात आले आहे. मंदार रांजेकर, अमर लांडे, रोमा लांडे, योगेश गोलांडे,अतुल सोनवणे आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Breaking News

By

Published : Sep 17, 2020, 9:11 PM IST

पुणे - स्वतःच्या आप्तांची भेट मृत्यूनंतरसुद्धा न झालेल्या मृतांच्या आत्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती लाभली. निमित्त होते बेवारस मृत बांधवांच्या अस्थी विसर्जनाचे. राष्ट्रीय कला अकादमी न्यास व पुणे महानगरपालिका ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भावनाप्रधान कार्यक्रमाचे यंदा सलग ११वे वर्षे होते. दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला संगम घाट येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. आरोग्य सेवा क्षेत्रात गेली २५ वर्षे निरपेक्ष काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कुंदेन यांच्या हस्ते या अस्थीचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले.

बेवारस मृतांच्या अस्थीचे पूजन करुन विसर्जन

या प्रसंगी नगरसेविका लता राजगुरु, डॉ. मिलींद भोई, पियुष शहा, बाला शुक्ला, म.न.पा. आरोग्य निरीक्षक विक्रम सरोदे, नागेश लांडगे, रमेश कांबळे,अजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

बेवारस मृतांच्या अस्थीचे पूजन करुन विसर्जन

यावर्षी ३५ मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून त्या विसर्जित करण्यात आले आहे. पुण्यात दरमहा पंधरा ते वीस निराधार आणि बेवारस व्यक्तींचे मृत्यू होते. त्यांच्या अस्थी कैलास स्मशानभूमीत ठेवल्या जातात विशिष्ट कालावधीनंतर त्यांची शासकीय नियमाप्रमाणे विल्हेवाट लावली जाते. या पार्श्वभूमीवर या अस्थींचे विधिवत पूजा करून त्यांचे विसर्जन करण्याचा उपक्रम आम्ही करत आहोत. बेवारस मृत बांधवांच्या आत्म्यांना शांती लाभण्यासाठी संस्थेकडून पुणे महानगर पालिकेच्या सहकार्यातून गेली ११ वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर यांनी दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अमर लांडे, रोमा लांडे, योगेश गोलांडे,अतुल सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे.

बेवारस मृतांच्या अस्थीचे पूजन करुन विसर्जन

ABOUT THE AUTHOR

...view details