महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Karmalkar On Sayali Agawane : सायली आगवणे यांची जिद्द समाजासाठी प्रेरणा देणारी - कुलगुरु करमळकर - sayali agawane Nitin Karmalkar

अथक परिश्रम केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात हे सायली आगवणे यांनी दाखवून दिले. अपंगत्वावर मात करत शास्त्रीय नृत्य जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी सायली आगवणे यांचे मोलाचे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिली ( Nitin Karmalkar On Sayali Agavane ) आहे.

Nitin Karmalkar On Sayali Agavane
Nitin Karmalkar On Sayali Agavane

By

Published : Mar 20, 2022, 8:11 PM IST

पुणे - अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. या महिला समाजाला दिशादर्शक, असे काम करतात. अपंगत्वावर मात करून शास्त्रीय नृत्य जागतिक स्तरावर घेऊन जाण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या कथक नृत्यांगना सायली आगवणे यांनी समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी केले ( Nitin Karmalkar On Sayali Agavane ) आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने पुण्यातील कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोम प्रभावित सायली आगवणे यांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्यानिमित्ताने मॉडर्न विकास मंडळाच्या वतीने पौड रोड येथील न्यु इंडिया स्कूल येथे सायली आगवणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला.

कुलगुरु करमळकर संवाद साधताना

यावेळी बोलताना कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, अथक परिश्रम केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात हे सायली आगवणे यांनी दाखवून दिले. अनेक विद्यार्थी शारिरीकदृष्ट्या सक्षम असून, देखील शैक्षणिक, कला, क्रिडा गुणांमध्ये कमी पडतात म्हणून पालक तक्रारी करत असतात. त्यांच्यासाठी सायलीची जिद्द एक प्रेरणा ठरेल, असेही करमळकर यांनी सांगितले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्रसिद्ध कथ्थक नृत्य गुरु शमाताई भाटे, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेशजी पांडे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संदीप बुटाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अजित वाराणसीवार यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. मनिषा बुटाला यांनी केले.

हेही वाचा -Summer Special Train : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पाच विशेष गाड्या

ABOUT THE AUTHOR

...view details