पुणे- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ( Nana Patole on Prithviraj Chavan action ) पक्षाने कारवाई करावी अशी मागणी भारतीय काँग्रेसचे देशाबाहेरील कामकाजासाठीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी केली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारल असता ते म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत आमच्याकडून कुठलीही माहिती गेली नाही. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बातम्या करा, असा सल्लाही त्यांनी ( Nana Patole on Media news ) माध्यमांना दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे दौऱ्यावर असताना मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची ( Nana Patole Kasaba Ganpati Darshan ) आरती आणि पूजा केली. यावेळी पटोले म्हणाले, की गेली 2 वर्ष कोरोनाच्या महामारीत आमची संस्कृती आमचं धर्म यापासून आपण दूर झालो होतो. आत्ता कोरोना मुक्त झाल्यानंतर आपण उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहोत. या सणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा महागाई आहे. विघ्नहर्ताच्या समोर आम्ही प्रार्थना करतो की देशात आणि राज्यात जे सत्तेत बसले आहे त्यांना सद्बुद्धी देवो. महागाई आणि बेरोजगार तरुणांच्या हाती काम मिळावे, अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली, असे यावेळी पटोले म्हणाले.
यांच्या कर्मामुळे कोरोना आलागणेशोत्सव निर्बंध मुक्त होण्यावर शिंदे सरकार श्रेय घेत आहे. यावर पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव हे कमी झाले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले. आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहे की माझ्या नशिबाने भाव कमी झाले. आपल्याकडे म्हण आहे कावळा बसला आणि फांदी पडायला तस कोरोना कोणी आणला त्यावर जायचं का? यांच्या कर्मामुळे कोरोना आला होता. ते देशाने भोगले. त्याचेही श्रेय घ्यायला लावा ना, यांना असा टोला यावेळी पटोले यांनी लगावला.