पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केल्यानंतर आपली जबाबदारी वाढते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे उभे करून चालणार नाही तर आपल्याला महाराजांचे विचार आत्मसात करावे लागतील असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात ( Nana Patekar On Chatrapati Shivaji Maharaj in pune ) बोलताना मांडले आहे.
'तर आताचे सर्व प्रश्न सुटतील'
पुण्यातील बाणेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. महाराजांची विचारसरणी ही सर्वधर्म समभाव आहे आणि आपण जर तीच विचारसरणी अंमलात आणली तर आताचे सर्व प्रश्न सुटतील. अशी भूमिका देखील नाना पाटेकर यांनी मांडली आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विचारांचा उपयोग काही राजकीय आणि विद्वान मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी करतात. त्याकडे लक्ष देऊ नका असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.