पुणे - गणपतीची मूर्ती साकारणारे आजवर अनेक हात तुम्ही पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला असे हात दाखवणार आहोत जे उद्याचे उज्वल भविष्य आहेत. तेच हात आज देशाला एकजुटीचा संदेश देत आहेत.
गणेशाची मूर्ती साकारणारे हे आहेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचे. गणेशोत्सवात मित्रांच्या घरचे बाप्पा पाहणारे, बाप्पांचे चित्र रेखाटणारे हे हात शाडू मातीच्या गोळ्यापासून बाप्पांना साकारण्यासाठी एकवटलेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून शाडूची मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून आकुर्डीच्या फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत हा उपक्रम पार पडला.
मुस्लिम विध्यार्थ्यानी आपल्या हाताने घडवलेली ही बाप्पाची मूर्ती ते त्यांच्या हिंदू मैत्रिणींना भेट म्हणून देणार आहेत. तर गणेशोत्सवादरम्यान त्याच मैत्रिणीच्या घरी आरतीलाही ते हजर राहणार आहेत.