महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Murder over washing utensils in pune : पुण्यात भांडी घासण्याच्या कारणातून वाद, चाकूने भोसकून रूममेटचा खून

मला भांडी घासायला सांगतोस, असे म्हणत रूमवर एकत्र राहत असलेल्या कामगार मित्रानेच दुसऱ्या मित्राचा ( Murder over washing utensils in pune ) चाकूने भोसकून खून केला. पुण्यातील बाणेरमध्ये ही घटना घडली. अमर बसंत मोहपात्रा (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

murder
हत्या

By

Published : Apr 25, 2022, 8:41 AM IST

पुणे - मला भांडी घासायला सांगतोस, असे म्हणत रूमवर एकत्र राहत असलेल्या कामगार मित्रानेच दुसऱ्या मित्राचा ( Murder over washing utensils in pune ) चाकूने भोसकून खून केला. पुण्यातील बाणेरमध्ये ही घटना ( Murder of roommate in pune ) घडली. अमर बसंत मोहपात्रा (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांनी अनिलकुमार सरतकुमार दास (वय 21) याला अटक केली आहे. मृत मोहपात्रा आणि आरोपी दोघेही मूळचे ओडिशाचे राहणारे आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ९.४० च्या सुमारास घडली.

हेही वाचा -खेड शिवापूर टोल नाक्याचा पुन्हा वाद, कामगारदिनी होणार जन आंदोलन

काय आहे प्रकरण? -याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मूळचे ओडिशाचे असलेले तीन कामगार पुण्यात काम करतात. हे तिघेही बाणेरमधील एकाच सोसायटीत राहतात. त्यादिवशी कामावरून परतल्यानंतर सकाळची राहिलेली भांडी घास, असे अमर याने अनिल कुमार दास याला सांगितले. यावरून आरोपी अनिलकुमार सरतकुमार दास याने रागाच्या भरात तू मला भांडी घासायला कसा काय सांगतो, असे म्हणत किचनमधील भाजी चीरायचा चाकू घेऊन अमर याच्या छातीत खुपसला. वार इतका भयंकर होता की अमर मोहपात्रा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चतुर्श्रुंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी अनिलकुमार सरतकुमार दास याला अटक केली.

हेही वाचा -Attack On Kirit Somaiya : 'राज्यात झुंडशाहीचे राजकारण, पोलिसांवर क्रॉस मिस कंडक्टची कारवाई करा'

ABOUT THE AUTHOR

...view details