पुणे - पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे बंद खोलीत आई आणि चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला आहे. या दोघांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना समोर आली. खून झालेल्या महिलेचे सुमय्या शेख आणि चार वर्षीय चिमुकल्याचे अय्यान शेख असे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांचा खून करण्यात आला असावा असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
बंद खोलीत आढळला मायलेकराचा मृतदेह!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे दरवाजाला कडी असलेल्या खोलीतून उग्र दुर्गंधी येत असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळले. आई आणि मुलाचा चाकूने वार करून खून झाल्याचे उघड झाले आहे.