महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Girlfriend Murder : पुण्यात धक्कादायक घटना; प्रेयसीचा लॉजवर नेऊन गळा चिरून निर्घृण खून - भारती विद्यापीठ

पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लॉजवर एक धक्कादायक घडली आहे. प्रियकरासोबत गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून ( Girlfriend murder in pune ) केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दीप्ती काटमोडे (वय 24) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Girlfriend murder in pune
प्रेयसीचा लॉजवर नेऊन गळा चिरून निर्घृण खून

By

Published : Jul 11, 2022, 6:52 PM IST

Updated : Jul 11, 2022, 9:34 PM IST

पुणे - पुण्यात एक धक्कादायक घडली आहे. पुण्यातील स्वारगेट सातारा रस्त्यावरील एका लॉजवर प्रियकरासोबत गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून ( Girlfriend murder in pune ) केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दीप्ती काटमोडे (वय 24) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तरुणीचा मृतदेह होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला - पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील शितल लॉजवर ही घटना घडली आहे. सकाळी रूमची साफ-सफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली. त्यावेळी त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने ही माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिचा गळा चिरून खून झाल्याचे समोर आले आहे.

खूनाचा गुन्हा दाखल - याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी भोर येथून सचिन राजू शिंदे (वय 30, रा. वारजे) याला अटक केली आहे. शिंदे हा महिलेचा खून केल्यानंतर फरार झाला होता. ही घटना रविवारी (दि.10) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दोघात झाला होता वाद - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली महिला करुणा विवाहित असून तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती एका हॉटेलमध्ये काम करतो. आरोपी सचिनशी तिची काही महिन्यांपूर्वी एका कंपनीत काम करत असताना ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. रविवारी (10 जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोघेजण पुणे-सातारा रस्त्यावरील शीतल लॉजमध्ये आले होते. सचिन हा करुणा हिच्यावर संशय घेत होता. त्यावरून दोघांत वाद झाले. त्यावेळी त्याने करुणाच्या गळ्यावर चाकुने वार केले. त्यानंतर तो पसार झाला होता. आरोपी भोर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला भोर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली.

हेही वाचा -Sword Attacked In Malegaon : मालेगावात खुलेआम गुंडाचा हैदोस; प्रकार सीसीटीव्हीत कैद

Last Updated : Jul 11, 2022, 9:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details