महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Deccan Queen : महाराष्ट्राची लाडकी दख्खनची राणी झाली ९२ वर्षांची; असा होता डेक्कन क्वीन चा प्रतिभाशाली प्रवास

Deccan Queen : स्वतंत्रपूर्व काळात म्हणजे जेव्हा भारतावर इंग्रजांची राजवट होती. तेव्हा ब्रिटिशांनी ग्रेट इंडियन पेनिनसुला या रेल्वे कंपनीने पहिली लक्झरीयस ट्रेन सेवा म्हणून 1 जून 1930 रोजी मुंबई-पुणे मार्गावर ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस सुरू केली होती. त्यास आज ९२ वर्षेपूर्ण होत आहे.आता मुंबई ते पुणे दरम्यान नव्या रंगात एलएचबी डब्यासह दख्खनची राणी धावणार आहे.

Deccan Queen
डेक्कन क्वीन

By

Published : Jun 2, 2022, 4:28 PM IST

मुंबई -भारतीय रेल्वेची महाराणी असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही ( Deccan Queen ) रेल्वे ९२ वर्षांची झाली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईला रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या ‘दख्खनच्या राणी’ने ९३ वर्षात पदार्पण केले आहे. आता मुंबई ते पुणे दरम्यान नव्या रंगात एलएचबी डब्यासह दख्खनची राणी धावणार आहे. ( mumbai pune mumbai Deccan Queen Railway now completed 92 years )

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची प्रतिक्रिया

असा आहे इतिहास -स्वतंत्रपूर्व काळात म्हणजे जेव्हा भारतावर इंग्रजांची राजवट होती. तेव्हा ब्रिटिशांनी ग्रेट इंडियन पेनिनसुला या रेल्वे कंपनीने पहिली लक्झरीयस ट्रेन सेवा म्हणून 1 जून 1930 रोजी मुंबई-पुणे मार्गावर ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस सुरू केली होती. त्यास आज ९२ वर्षेपूर्ण होत आहे. ही भारतातील पहिली अति जलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटिश लोकच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे १९४३ मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी भारतीयांना देण्यात आली. तेव्हापासून या गाडीकडे प्रवाशांचा जो ओघ सुरू झाला तो आजही कायम आहे. आशिया खंडातील विद्युतीकरणावर धावणारी पहिली इंटरसिटी ट्रेनही डेक्कन क्वीन आहे. इतकेच नव्हे तर देश-विदेशातून अनेक अ‍ॅवार्ड या ‘दख्खनच्या राणी नावाने आहे. विशेष म्हणजे या भारतीय रेल्वेची महाराणी ही एकमेव प्रवासी ट्रेन गेली ९२ वर्षं खंडाळ्याच्या घाटातून मुंबई ते पुणे धावत आहे.

आजपासून दख्खनच्या राणीचा नवा साज -1 जून 1930 पासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेस हे मुंबई ते पुणे दरम्यान धावत आहे. तेव्हापासून रेल्वेच्या पहिल्या सुपरफास्ट गाडीचे वैशिष्ट्ये असलेली डायनिंग कार (चाकावरचे उपहारगृह )आहे. आता डेक्कन क्वीनला निळ्या व पांढऱ्या रंगाऐवजी नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. या गाडीचे डब्बे एलएचबी एलएचबीचे स्वरूप देण्यात आल्यानेही गाडी नव्या साजात प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. नव्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस 16 कोच आहे. ज्यामध्ये चार एसी चेअर कार, 8 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक एसी डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार.

असे झाले बदल -

  • 1 जुन 1930 पासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेस 7 डब्यांचा दोन गाड्या धावत होत्या.
  • डेक्कन क्वीनमध्ये सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती.
  • 1 जानेवारी 1949 रोजी प्रथम श्रेणी रद्द करण्यात आली आणि द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली.
  • एप्रिल 1974 पासून 7 डब्यांवरून वाढवून 12 डब्यांची डेक्कन क्वीन करण्यात आली होती.
  • 1995 मध्ये १२ डब्यांवरून वाढवून १७ डब्यांची डेक्कन क्वीन करण्यात आली होती.
  • १५ आगस्ट २०२१ ला डेक्कन क्वीन विस्टाडोम कोच जोडण्यात आला.
  • २२ जून २०२२ पासून डेक्कन क्वीनला निळ्या व पांढऱ्या रंगाऐवजी नवीन रंगसंगती धावणार आहे.

दुसरी डेक्कन क्वीनचे लवकरच - गेल्या दोन महिन्यापूर्वी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधून नव्या डेक्कन क्वीनचे 16 डबे मुंबईत दाखल झाले होते. मात्र, दुसरी नवीन डेक्कन क्वीन एक्स्प्रेस येत्या काही दिवसांत पुण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर 22 जून 2022 पासून नव्या रंगात एलएचबी डब्यासह नवीन डेक्कन क्वीन एक्सप्रेस धावणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंग असणार -ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा रंग सुद्धा बदलण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने डेक्कन क्वीनसाठी लाल, हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्यांसह "प्रतिबंधित इम्प्रेरियम" रंगाची छटा निश्चित केली आहे. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेक्कन क्वीनने प्रवास करुन नियमित प्रवाशांशी संवाद साधल्यानंतरच रंग निश्चित करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये प्रथमच एका ट्रेनचा रंग इतर गाड्यांपेक्षा वेगळा आहे.

असा आहे डायनिक कार - नवीन डायनिंग कार ही अपघातरोधक असणार आहे. एलएचबी डब्यांमुळे अपघाताची तीव्रता कमी होणार आहे. तर, डायनिंग कार मध्ये 10 टेबल असणार आहेत. यावर 40 प्रवासी बसू शकतील. तसेच नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ प्रवाशांना मिळणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा -जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला, माजी पत्नी अंबर हर्ड देणार 1.5 अब्ज नुकसान भरपाई

ABOUT THE AUTHOR

...view details