पुणे - पुण्यात एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीने MPSC Student Suicide Pune आत्महत्या केली आहे. पुण्यातील गांजवे चौकात हा मुलगा राहत होता. 2022 ला त्याने पूर्व परीक्षा दिली होती तसेच मंत्रालयात क्लर्क पदासाठीही परीक्षा दिली असल्याची माहिती आहे. त्रिगुण कावळे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा मुलगा जालना जिल्ह्यातील रहिवाशी आहे. या विद्यार्थीने चिठ्ठी लिहीली असून नैराश्यातून मी आत्महत्या केली आहे असे त्याने लिहले आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नका असेही त्याने लिहिले आहे. त्रिगुणच्या घरी त्याची आई-वडील आणि एक छोटा भाऊ आहे. आई-वडील शेतीच करतात.
MPSC Student Suicide Pune : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या - तरुणाची आत्महत्या पुणे एमपीएससी
पुण्यात एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीने MPSC Student Suicide Pune आत्महत्या केली आहे. पुण्यातील गांजवे चौकात हा मुलगा राहत होता. 2022 ला त्याने पूर्व परीक्षा दिली होती तसेच मंत्रालयात क्लर्क पदासाठीही परीक्षा दिली असल्याची माहिती आहे.
जालना जिल्ह्यातील घाणेवाडी येथील हा विद्यार्थी असून गेल्या अनेक दिवसांपासून तो पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा देत होता. तेथील विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार जवळपास सात-आठ वर्षे झाला तो पुण्यात परिक्षांची तयारी करत होता. एमपीएससीच्या नुकत्याच झालेल्या पीएसआयची परीक्षाही त्याने दिली होती. त्यामध्ये तो पासही झाला होता.
त्रिगुणच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार त्याचे दिवसभर अभ्यास करण्याचे एक रुटीन होते. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांचा एक वर्गमित्र होता तो रूममध्ये होता. परंतु रविवार असल्यामुळे रूम स्वच्छ करण्याची आहे असे सांगून त्रिगूणने तु बाहेर जा असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने मित्र जेव्हा रुमवर आले तेव्हा खुपवेळा दार वाजवले पण दार उघडले गेले नाही. त्यानंतर दरवाजा तोडला तर त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.