पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराला त्याच्या मित्राच्या मदतीने पेपर सोडवण्यासाठी मोबाईल घेऊन गेल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली आहे. केवलसिंग चैनसिंग गुशिंगे (वय- 30) रा औरंगाबाद असे आरोपीचे नाव आहे.
MPSC च्या नियमानुसार कारवाईची प्रक्रिया -एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१- संयुक्त पेपर १ परीक्षा राज्यभरातील 6 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले आहे. या प्रकाराची एमपीएससीकडून गंभीर दखल घेत एमपीएससीच्या नियमानुसार कारवाईची प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांकडून मित्राचा शोध सुरु - गुशिंगे हे 6 ऑगस्ट रोजी नर्हे येथील सिंहगड कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील केंद्रावर एमपीएससी ग्रुप सी मुख्य परीक्षेला बसले होते. तो सेल फोन, ब्लूटूथ स्पीकर आणि रबराने लॅमिनेटेड दोन मायक्रो सेल घेऊन परीक्षा कक्षात प्रवेश केला. आरोपींना यंत्राद्वारे मित्राशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका सोडवायची होती, असे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांकडून मित्राचा शोध घेतला जात आहे.