पुणे -पुण्यातील 183 अॅमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा घाट महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप पक्षाने घातला आहे. शहराच्या दृष्टीने अतिशय घातक अशा या निर्णयाला पुणेकरांनी कडाडून विरोध करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले आहे. शहर विकास आराखड्यातील आरक्षणे तसेच अॅमेनिटी स्पेस या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असतात. मात्र, अॅमेनिटी स्पेसला विशिष्ट कारणासाठी आरक्षण नसल्यामुळे कोणीही कुठल्याही कारणासाठी त्याचा वापर करू शकते. यासाठी अॅमेनिटी स्पेसचा 'मास्टर प्लॅन' करण्याची गरज आहे. तसेच ज्या आरक्षित जागेवर बिल्डिंग उभारण्यात येणार आहे, त्या ग्रीन बिल्डिंग असणे देखील गरजेचे आहे, असेही यावेळी वंदना चव्हाण यांनी सांगितले.
पुणे शहरात 183 अँमेनिटी स्पेसचा विषय ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने डॉकीट ठेवले आहे. त्याच्यात काही ठिकाणी आरक्षण आहे ते आपण लिझवर देणार आहेत. मात्र आमची ही मागणी आहे की जे अॅमेनिटी स्पेस आहे, त्यांचे एक मास्टर प्लॅान झाले पाहिजे. महापालिका प्रत्येक प्लॉटच डेव्हलपमेंट करू शकत नाही. पण हे करत असताना जर मास्टर प्लॅान नसेल तर कशाही पद्धतीने या अॅमेनिटी स्पेसचा वापर होईल. तसेच जे 183 अॅमेनिटी स्पेस लिझवर काढणार आहोत, त्याच्यात अर्बन फॉरेस्टीच कुठेही उल्लेख नाही. पण तो उल्लेख आत्ता ३३ टक्के प्लॉट्सवर व्हावा, अशा पद्धतीची सूचना देखील आम्ही दिली आहे, असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी देखील अॅमेनिटी स्पेसचा 'मास्टर प्लॅन' करावा, असे महापालिका आयुक्तांना सूचित केले होते. या सूचनांची पर्वा न करता भाडे तत्वावरच्या या प्रस्तावाला स्थायी समिती समोर मान्यतेसाठी आणले आहे.
'सर्वांनी एकत्रित येऊन प्रस्तावाला विरोध करावा'