पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बारामती दर्यावरी येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील करण्यात आलेली (MP Supriya Sulestatement on BJP workers) आहे. यावर बारामती मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुप्रियाताई म्हणाल्या की, टॅलेंट हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. आपण जर दौरा बघितला तर सर्व जी प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे, ती लोकं राष्ट्रवादी, आणि काँग्रेसची आहे. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, यावेळी त्या बोलत (MP Supriya Sule statement in Baramati) होत्या.
भाजपमध्ये 50 टक्के लोक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे. मला वाईट वाटतंय की, जेव्हा संघर्षाचा काळ होता तेव्हा भाषण देण्यापासून ते सतरंज्या उचलण्यापासूनच काम त्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांना आत्ता कुठेही मानसन्मान होत नाहीये. पण बाहेरून आलेले 'हे' आहे, त्यांचा लगेच मानसन्मान होतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की, आमच्याकडील टॅलेंट लोकांचा तिथे जाऊन तर मान सन्मान होत असेल तर खूपच चांगला आहे. बारामती मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली, यावेळी त्या बोलत (BJP workers not getting respect) होत्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बारामती दर्यावरी येत आहे. ज्याप्रमाणे आम्ही अमेठी जिंकली, तशीच बारामती देखील जिंकू अस भाजपचे आमदार राम शिंदे म्हणाले. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझं आयुष्य हे अतिशय पारदर्शक आहे. गेल्या 13 वर्षापासून या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. माझं सोशल मीडिया जर बघितलं, तर माझ्या कामाचा वेग काय आहे ? हे सगळ्यांना कळेल.
दुर्दैवाने पालकमंत्री नसल्याने कोणतीही बैठक नाही -जेव्हा अजितदादा हे पालकमंत्री होते, तेव्हा शहरातील विविध प्रश्नांवर बैठक होत होती. पण दुर्दैवाने अडीच महिन्यांपासून पालकमंत्री नसल्याने कोणतीही बैठक होत नाहीये. धायरी, वारजे, या ठिकाणी कचऱ्याचे ढीग वाढायला लागले आहे. तसेच पाऊस झाला असताना देखील वारजे तसेच खडकवासला येथे पाणी कपात होत आहे. माझ्या मतदार संघातील विविध कामांच्या संदर्भात आज पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी मी आयुक्तांची भेट घेतली आहे, असं यावेळी सुळे म्हणाल्या.