पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका नामांकित सोसायटीत जेवणाची डिलिव्हरी करण्यास आलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा ( Zomato Delivery Boy Molested Young Girl ) धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत, डिलिव्हरी बॉयने तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले आहे. तरुणीने तत्काळ याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत डिलिव्हरी बॉयला अटक ( Kondhwa Police Case Against Zomato Delivery Boy ) केली आहे.
त्याला शिक्षा झालीच पाहिजे : सुप्रिया सुळे : रईस शेख (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जे झाले आहे ते खूपच दुर्दैवी आहे, असे व्हायला नको पहिजे होते. अशा गोष्टी समाजात कुठेही होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच, डिलिव्हरी कंपनीनेदेखील याबाबत काळजी घेतली पाहिजे. ज्याने हे केले आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे मत यावेळी सुळे व्यक्त केले.