बारामती :राज्यातील सरकार योग्य काम करीत नसल्याची टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ( MP Supriya Sule Criticize on Shinde Government ) केली. त्या बारामती दौऱ्यावर असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे सरकारवर चौफेर टीका केली. पितृपंधरवाड्यामुळे अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची चर्चा आहे. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याचे मला फारसे ज्ञान नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सरकार येऊन अडीच महिने ( Two and Half Months Minister Did Not Go to Office ) झाले आहेत.. ज्यांना कामच करायचे नाही, रुसवे फुगवे आहेत. त्यांनी 50 खोके घेतले ( They Took 50 Boxes So They Dont Feel to Need work ) आहेत. त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा टोला ( MP Supriya Sule Criticize on New Government ) सुळेंनी ( Conspiracy Against Maharashtra ) लगावला.
महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र :बारामती किंवा पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने एक षडयंत्र होत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत केला. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपली खुर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला लावत आहे. असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
अडीच महिने होऊनही मंत्री कार्यालयात गेले नाही :महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे नेऊ, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना काढले. यावर अधिक भाष्य न करता आम्ही त्याची वाट बघतोय, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
लहान मुलांच्या गृहपाठबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत सरकारशी करणार चर्चा :पहिली ते चौथीपर्यंतच्या गृहपाठबाबत सरकार काही बदल करू इच्छित आहे. यावर बोलताना सुळे म्हणाले की, कोविड काळात मुलांच्या शिक्षणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अजून काही बदल करू नयेत. बदल करायचेच असतील तर तज्ञांना विचारून करावेत. याबाबत मी सरकारशी बोलणार असून, नेमकं सरकारच्या मनात काय आहे हे जाणून घेणार आहे..