पुणे -आपल्यावर अथवा आपल्या कुटुंबातील लोकांवर कारवाई होईल, अशी भीती वाटल्यानंतर माणूस सैरभैर होतो. तशी स्थिती आता संजय राऊत यांची झाली आहे. त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहे. त्यांनी शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतले आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला ( Chandrakant Patil On Sanjay Raut ) आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांना बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्यावर नाहीतर आपल्या कुटुंबातील लोकांवर कारवाई होईल, अशी भीती वाटल्याने माणूस सैरभैर होतो. तशीच स्थिती संजय राऊत यांची झाली आहे. त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहे. त्यांनी शिवसेनेला संपवण्याचे कंत्राट घेतले आहे. गेल्या 27 महिन्यांत एकही शिवसेना नेता बोलत नाही. फक्त राऊत दिवसरात्र बोलत आहे, आणि ते आज जे शब्द उच्चारले आहे ते नेहमीच असे बोलतात, अशी टीकाही पाटील यांनी केली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत आहे. त्याबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की, 2019 ला असेच सर्व पक्ष एकत्र आले होते. जेव्हा मतमोजणी होती तेव्हा सर्वांनी नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले होते. मग काय झाले ते देशाने पाहिले. 2023 ला मोदीजी 400 च्या खाली येणार नाही. 2014 ते 19 मोदीजी यांनी नेहमीच नागरिकांच्या सामान्य गरजा लक्षात घेतल्या. 2024 नंतर त्यांचा अजेंडा मोठा खूप मोठा आहे. या भेटीगाठी घेऊन काहीही होणार नाही, तर तेलंगणात भाजपा कशी वाढत आहे, याची त्यांनी काळजी करावी, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.