पुणे- शहरात वाढलेल्या कोरोनामुळे सरकारने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली केली आहे. मात्र त्यांच्या बदलीला भाजपने विरोध केला आहे. गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा असून सरकारने त्यांना बळीचा बकरा बनवल्याचा आरोप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे.
महापालिका आयुक्तांच्या बदलीला भाजपचा विरोध; गिरीश बापट म्हणाले . . . - गिरीश बापट यांची बदलीवरुन सरकारवर टीका
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या बदलीला भाजपने विरोध केला आहे. एकीकडे पुण्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे म्हणायचे. दुसरीकडे राजकारण करत अधिकाऱ्यांच्या बदल्या करायचे असा आरोपही खासदार गिरीश बापट यांनी केला आहे.
![महापालिका आयुक्तांच्या बदलीला भाजपचा विरोध; गिरीश बापट म्हणाले . . . pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8007338-910-8007338-1594635008333.jpg)
खासदार गिरीश बापट
महापालिका आयुक्तांच्या बदलीला भाजपचा विरोध; गिरीश बापट म्हणाले . . .
राजकारण न करण्याचा सल्ला देणारे सरकारच अधिकाऱ्यांच्या बदलीवरुन राजकारण करत आहे. एकीकडे पुण्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे म्हणायचे. दुसरीकडे राजकारण करत अधिकाऱ्यांच्या बदल्या करायचे असा आरोपही बापट यांनी केला आहे. अशा परिस्थितीत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करणे म्हणजे पुण्याचे नुकसान करणे आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो, असेही गिरीश बापट यांनी यावेळी सांगितले आहे.
Last Updated : Jul 13, 2020, 4:26 PM IST