पुणे- राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ( Rajya Sabha Election Result ) यशाचे श्रेय आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना जात, असे वक्तव्य खासदार अनिल बोंडे ( MP Anil Bonde ) यांनी केले. या विजयानंतर त्यांनी पुण्यात आमदार मुक्ता टिळक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी टिळक यांना भेटून आनंद झाला त्यांनी स्वतःची तब्येत, घर सोडून या विजयात मोलाचे योगदान दिले, म्हणूनच आमच्या विजयाचे श्रेय या दोघांना आम्ही देतो, असे ते म्हणाले. या मतदानाच्या वेळी मुक्ता टिळक यांनी माझ्या नावापुढे पहिली पसंती दाखवली होती आणि त्यांच्यामुळेच हा विजय शक्य झाला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून जे काम केले आहे त्याबद्दल त्यांना भेटून त्यांचे आभार मानणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्या लवकर बरे होऊन समाजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे, अशी मी प्रार्थना करणार आहे, असे बोंडे म्हणाले.
संजय राऊत यांचा अहंकार आडवा येतोय, मुक्ता टिळक यांच्या भेटीनंतर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया - Mukta Tilak
राज्यसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ( Rajya Sabha Election Result ) यशाचे श्रेय आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना जात, असे वक्तव्य खासदार अनिल बोंडे ( MP Anil Bonde ) यांनी केले. या विजयानंतर त्यांनी पुण्यात आमदार मुक्ता टिळक यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
राऊत यांचा अहंकार आडवा येतोय - या सत्ताधारी सरकारने संभाजीराजे छत्रपतींचा आणि संजय पवारांचााही अपमान केला आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून शिवसेना फक्त फसवण्याचे काम करत आहे. फसवणुकीशिवाय शिवसेनेला दुसरे काम नाही, या सगळ्यात संजय राऊत यांचा अहंकार आडवा येत आहे, त्यांना जो सत्तेचा माज आला आहे आणि तो बरा नव्हे, असे म्हणत बोंडे यांनी संजय राऊत व शिवसेनेवर टीका केली. तसेच शिवसेनेला निवडणूक प्रक्रियाच समजली नाही, असे म्हणत सुहास कांदे यांचे मत बाद झाले नसते तरीही शिवसेनेचा पराभवच झाला असता, असेही अनिल बोंडे म्हणाले.
हेही वाचा -Amruta Fadnavis : वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या; अमृता फडणवीस यांची मागणी