पुणे - समाजकंटकांनी विटंबना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळुरू येथील पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद (शिवगर्जना) देऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Shiv garjana by Amol Kolhe in Bangalore ) यांनी शिवजन्मोत्सव दिनी शिवरायांना मानवंदना दिली.
शिवाजी महाराजांना अभिवादन करताना खासदार अमोल कोल्हे हेही वाचा -Ajit Pawar on Reservation : 'मराठा आरक्षणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा'
शिवनेरी गडावर जाण्याऐवजी बंगळुरू येथे शिवरायांना अभिवादन
डिसेंबर महिन्यात कर्नाटकातील रणधीर सेनेच्या गुंडांनी बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात पडसाद उमटले होते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची विटंबना केल्याची सल खासदार डॉ. कोल्हे ( Amol Kolhe ) यांच्या मनात होती. त्यामुळे, यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरी गडावर जाण्याऐवजी बंगळुरू येथे जाऊन छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्यासमोर ऐतिहासिक गारद (शिवगर्जना) देऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळुरू येथील पुतळ्यासमोर स्वतः पहाडी आवाजात गारद (शिवगर्जना) देऊन मानवंदना दिली.
दैवताचा अपमान सहन केला जाणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत असून, या दैवताचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे, जिथे त्यांची विटंबना करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला, तिथे जाऊन सन्मानपूर्वक मानवंदना देऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या कृतीतून समाजकंटकांना जणू इशारा देत खऱ्याअर्थाने आपण छत्रपती शिवरायांचा मावळा असल्याचे दाखवून दिले. खासदार डॉ. कोल्हे यांनी मानवंदना देण्यापूर्वी कर्नाटक सरकारच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. त्यामुळे, डॉ. कोल्हे यांना मानवंदना देण्यासाठी विलंब झाला. मात्र, यंदा प्रथमच कर्नाटक सरकारच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम झाल्याचे स्थानिक शिवप्रेमींनी निदर्शनास आणून त्याबद्दल आनंद व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे, त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणे ही क्लेशदायक बाब आहे. त्यामुळे, कुठल्याही परिस्थितीत हा प्रकार समर्थनीय नाही. त्यामुळेच, या ठिकाणी येऊन जाहीरपणे गारद (शिवगर्जना) करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचे ठरवले होते. त्यानुसार अतिशय चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
हेही वाचा -Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : प्रत्येकानेच आदर्श घ्यावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची खास गुणवैशिष्ट्ये