पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 246 नवीन रुग्ण; 9 जणांचा मृत्यू - पुण्यातील कोरोनाबाधित
मंगळवारी दिवसभरात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे 246 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.
![पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 246 नवीन रुग्ण; 9 जणांचा मृत्यू पुणे कोरोना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10:41-mh-pun-korona-update-26052020220858-2605f-1590511138-274.jpeg)
पुणे - शहर परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात एकट्या पुणे शहरात कोरोनाचे 246 नवीन रुग्ण सापडले आहेत, तर 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.
आजपर्यंत पुण्यात कोरोनाची बाधा झालेले एकूण 5,427 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बरे झालेल्या 2,875 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बऱ्या झालेल्या 140 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये अजूनही 2,279 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 273 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडतच चालली आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.