पुणे -शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत असून गुरुवारी (दि. 25) सलग तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या सातशेच्या वर गेली असून चार बाधितांची उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी शहरात नवे 766 रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांची एकूण संख्या 2 लाख 462 इतकी झाली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 231 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामधील 3 रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.