पुणे -पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात 5138 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 6802 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात मंगळवारी कोरोनाबाधीत 75 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 20 रूग्ण पुण्याबाहेरील होते. सद्यस्थितीत पुण्यात 1277 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे शहरात 24 तासांत 5 हजारापेंक्षा जास्त रुग्ण आढळले
पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात 5138 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 6802 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात मंगळवारी कोरोनाबाधीत 75 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 20 रूग्ण पुण्याबाहेरील होते. सद्यस्थितीत पुण्यात 1277 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3 लाख 76 हजार 962 इतकी आहे. तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 52 हजार 977 झाली आहे.
शहरात आजपर्यत एकूण 6218 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 3 लाख 17 हजार 767 आहेत. शहरात आज 20 हजार 204 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील परिस्थिती
पुणे जिल्ह्यात मंगळवारी 10 हजार 393 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही 1 लाख 1 हजार 768 झाली आहे. यातील 24 हजार 996 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 76 हजार 772 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात 112 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत मृत झालेल्या रुग्णांचा आकडा 11 हजार 647 इतका झाला आहे.
हेही वाचा -राज्यात लागणार टाळेबंदी, लवकरच मुख्यमंत्री करणार घोषणा