महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आळंदी पोलिसांच्या आव्हानाला चारशे पेक्षा अधिक रक्तदात्यांची साथ - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

कोरोनामुळे रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. त्यामुळे आळंदी पोलीस स्टेशन आणि ‘पिंपरी चिंचवड ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ४०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आहे.

आळंदी पोलिसांच्या आव्हानाला चारशे पेक्षा अधिक रक्तदात्यांची साथ
आळंदी पोलिसांच्या आव्हानाला चारशे पेक्षा अधिक रक्तदात्यांची साथ

By

Published : Apr 29, 2021, 2:03 PM IST

पुणे- कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन आळंदी पोलीस स्टेशन आणि ‘पिंपरी चिंचवड ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी 09 ते सायंकाळी 06 दरम्यान फ्रुटवली धर्मशाळा वडगाव रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आळंदी पोलिसांच्या आव्हानाला चारशे पेक्षा अधिक रक्तदात्यांची साथ

400 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

यावर्षी संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. या उपक्रमास सकाळी 09 वाजता प्रारंभ झाला होता. सद्यस्थिती पाहता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन ‘आळंदी पोलीस’ आणि आळंदी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद देत 400 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पिंपरी-चिंचवड ब्लड बँक डोनर कार्ड देऊन दात्यांचा गौरव करण्यात आला.

'रक्तदानाच्या मार्फत आळंदीकरांनी दिली संजीवनी'

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलीस खात्यातील अनेक अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, 'हनुमान जयंतीच्या दिवशी आळंदी मध्ये रक्तदानाच्या महायज्ञाची सुरवात झाली असून, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहेत, हनुमंताने जशी लक्षमनासाठी संजवणी आणली होती, तशीच संजीवनी आज रक्तदानाच्या मार्फत आळंदीकरांनी उपलब्ध करून दिली आहे'.

कोरोना नियमांचे पालन

या कार्यक्रमाच्या वेळी सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत विशेष काळजी घेण्यात आली. हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आळंदी पोलीस निरीक्षक साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.

हेही वाचा -LIVE Updates : पश्चिम बंगाल विधानसभा मतदानाचा शेवटचा टप्पा!

ABOUT THE AUTHOR

...view details