महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पर्यटकांसाठी उघडले पुण्यातील शनिवार वाड्याचे दार; जिल्ह्यातील 20 पर्यटन स्थळे सुरू - पुणे जिल्हा कोरोना अपडेट

भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या मागणीनंतर पुण्यातील शनिवार वाडा,आगाखान पॅलेस, तर जिल्ह्यातील शिवनेरी, विसापूर, कार्ले लेणी अशी २० ठिकाणी पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील 20 पर्यटन स्थळे सुरू
जिल्ह्यातील 20 पर्यटन स्थळे सुरू

By

Published : Sep 23, 2021, 8:02 AM IST

पुणे- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण थोडेसे कमी झाले असून सरकारने जिल्ह्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या ४ महिन्यांपासून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद होती. मात्र आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पर्यटनस्थळावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या मागणीनंतर पुण्यातील शनिवार वाडा,आगाखान पॅलेस, तर जिल्ह्यातील शिवनेरी, विसापूर, कार्ले लेणी अशी २० ठिकाणी पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली आहेत.

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कोरोना आणि पर्यटन स्थळा बाबतीतील निर्बंधात थोडीशी शिथिलता दिली आणि पर्यटकांनी स्वतःच वाट मोकळी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांनी गर्दी केली आहे.

पुण्यातील शनिवार वाड्याचे दार
१७ तारखेपासून उघडले शनिवार वाड्याचे दार- पुण्याचे वैभव असलेला शनिवार वाडा देखील काही महिन्यांपासून बंद करण्यात आला होता. मात्र शहरातील कमी झालेली कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी यांनी १७ तारखेपासून शनिवार वाडा पर्यटकांसाठी पुन्हा खुला केला आहे. कोरोनाच्या सुरुवातीला शहरातील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यानांतर शनिवार वाडा सुरू करण्यात आला होता. मात्र परत दुसऱ्या लाटेत वाड्याचे दार बंद करण्यात आले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुसऱ्यांदा वाड्याचा दरवाजा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी येणाऱ्या पर्यंटकांना कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 20 पर्यटन स्थळे सुरू


अशी घेतली जातीय खबरदारी -

जिल्ह्याीतल पर्यटनस्थळे सुरू झाल्यानंतर सरकारने दिलेल्या नियमावली नुसारच पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. शनिवार वाड्यातही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केलेल्या पर्यटकांनांच आत सोडण्यात येत आहे. सुरुवातीला पर्यटक आल्यांनतर सॅनिटायझर करून घेणे, मग त्यानंतर त्यांचे तापमान पाहून मगच त्याला प्रवेश तिकीट देण्यात येत आहे. विना मास्क पर्यटकांना आत सोडण्यात येत नाही. तसेच सोशल डिस्टेनसिंगचा देखीलचे देखील या ठिकाणी पालन केले जात आहे. सध्या शनिवार वाडा येथे कोरोना नियमांचे उल्लघन होऊ नये म्हणून एकूण १६ सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पर्यटकांवर लक्ष ठेवले जात आहे.

पुण्यातील शनिवार वाड्याचे दार

ABOUT THE AUTHOR

...view details