महाराष्ट्र

maharashtra

सोलापुरात लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक; महापालिका आयुक्तांनी 'हे' काढले आदेश

By

Published : Apr 17, 2021, 1:37 AM IST

Updated : Apr 17, 2021, 4:01 AM IST

शहरातील प्रत्येक दुकानदारांनी कोविड-19 चे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. शहरातील दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर किंवा स्वतःचे लसीकरण केल्याबाबतची माहिती आपल्या दुकानात लावणे बंधनकारक आहे.

Solapur Lockdown
सोलापूर लॉकडाऊन

सोलापूर -कोरोना संसर्ग वाढता शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. हे नियम आणखीन कडक करणारे आदेश महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहे. शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. त्यानंतर बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींना मात्र कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशानुसार महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही मर्यादित वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटन चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकानांचा समावेश आहे.

सोलापुरात लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक

हेही वाचा-पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र लावणे बंधनकारक-

शहरातील प्रत्येक दुकानदारांनी कोविड-19 चे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. शहरातील दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट अथवा आरटीपीसीआर किंवा स्वतःचे लसीकरण केल्याबाबतची माहिती आपल्या दुकानात लावणे बंधनकारक आहे.

हेही वाचा-हाफकीन इन्स्टिट्यूट वर्षाला २२.८ कोटी लसीची निर्मिती करणार

नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने सील केली जाणार-
दूध संकलनासाठी डेअरी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानधारकांनी ग्राहकांना उभे राहण्याकरिता किमान एक मीटर अंतरावर गोल रिंगण आखणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या दिलेल्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व दुकानदारांनी कोविड-19 बाबत सुरक्षेचे सर्व उपाय करावेत. पारदर्शकता काचेतून ग्राहकांशी संवाद साधने किंवा फेसशिल्ड व इलेक्ट्रॉनिक पेमेंट इत्यादी नियमांचे काटेकोरपणे वापर करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास महानगरपालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.

सोलापूरमध्ये ऑक्सिजनचे वाढले दर-
सोलापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे सध्या ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्सिजनची मागणी वाढल्याने दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. पूर्वी एक ऑक्सिजनचा सिलिंडर साधारणपणे 119 रुपयांना मिळत असे, मात्र आता त्यामध्ये वाढ होऊन ऑक्सिजन सिलिंडरचा दर 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोलापूरमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज 40 ते 50 हजार ऑक्सिजन सिलिंडरची मागणी होत आहे.

Last Updated : Apr 17, 2021, 4:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details