महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 9, 2021, 9:06 PM IST

Updated : Jun 11, 2021, 1:27 PM IST

ETV Bharat / city

खुशखबर.. येत्या 3 दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार, बहुतांश शहरांमध्ये पावसाची रिपरिप

राज्यात नियोजित वेळेच्या आधीच दाखल झालेले नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली असून मान्सूनची आगेकूच लक्षात घेता येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज मान्सून संपूर्ण राज्यात पोहोचला असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश शहरांमध्ये पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

Monsoon will cover the whole of Maharashtra
Monsoon will cover the whole of Maharashtra

पुणे - राज्यात नियोजित वेळेच्या आधीच दाखल झालेले नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली असून मान्सूनची आगेकूच लक्षात घेता येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आज (शुक्रवार) बहुतांश शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

Monsoon will cover the whole of Maharashtra
यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात नियोजित 7 जून या वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे पाच जूनला आगमन झाले. मान्सूनचा वेगाने प्रवास सुरू असून येत्या 3 दिवसात संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले जाईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. दरवर्षी सरासरी 15 जूनला मान्सून संपूर्ण राज्य व्यापतो मात्र यंदा 12 जूनच्या आसपास मान्सून सर्व राज्य व्यापेल, असा अंदाज आहे. मान्सूनची अरबी समुद्रात वेगाने वाटचाल सुरूच असून अरबी समुद्राचा संपूर्ण मध्य आणि उत्तरेकडील काही भाग मान्सूनने व्यापला आहे तसेच संपूर्ण कोकण मुंबई, दक्षिण गुजरात, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणाचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागराचा मोठा भाग मान्सूनने बुधवारी 9 जूनला व्यापला आहे.
Monsoon will cover the whole of Maharashtra
Last Updated : Jun 11, 2021, 1:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details