पुणे - राज्यात अनेक ठिकाणी पूर्वमान्सूनला सुरुवात झाली आहे. यामुळे आता मान्सूनची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. उद्या राज्यात मान्सून दाखल होणार असून ११ तारखेपासून त्याचा वेग वाढणार असल्याचा अंदाज हावामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पाच दिवसांत मान्सून पूर्ण राज्य व्यापून टाकेल असे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
मान्सूनला सध्या पोषक वातावरण आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात १५ तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडणार असल्याचे ते म्हणाले. कोकण गोव्यात ११ तारखेपासून पुढील पाच दिवस सर्वत्र पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.