महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Crime :पुण्यात अवघ्या चार मिनिटात चोरले 11 लाखांचे मोबाईल; घटना सीसीटिव्हीत कैद - सिंहगड पोलीस ठाणे

चार मिनिटात अकरा लाखांच्या मोबाइलची चोरी ( Mobile Theft ) केल्याचा प्रकार पुण्यातील सिंहगड रोड धायरी ( Sinhagad Road Dhairi ) येथे घडला आहे. तर चोरीची घटना सीसीटिव्हीत कैद (Incident caught on CCTV) झाली आहे.

The Incident Was Caught On CCTV
घटना सीसीटिव्हीत कैद

By

Published : Jul 18, 2022, 10:53 AM IST

पुणे : अवघ्या चार मिनिटात अकरा लाखांच्या मोबाइलची चोरी केल्याची घटना धायरी गावांतील रायकर नगर परिसरात शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सांगळे टेलिकॉम मोबाईल हब या दुकानात ही चोरी झाली असून याप्रकरणी सचिन सांगळे यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात ( Sinhagad Police Station )फिर्याद दिली आहे. यावरून सिंहगड रोड पोलिसांनी ( Sinhagad Road Police) अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



मिळालेली माहिती अशी -शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एका कटावणीच्या साह्याने दुकानाचे शटरचे सेंटर लॉक उचकाटून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. एका पोत्यात अवघ्या चार मिनिटात दुकानातील ओप्पो ,सॅमसंग ,रेडमी, विवो ,वन प्लस ,लेनोवो, जिओ कंपन्यांचे मोबाईल फोन टॅबलेट व स्मार्ट वॉच असे जवळपास ६१ मोबाईल व इतर वस्तू चोरले आहे. या सर्व मोबाइलची सरासरी किंमत काढली तर हे सर्व मोबाइल ११लाख रुपये किमतीचे आहे. तसेच गुन्हेगारांनी चोरी करताना पूर्ण तोंड कपड्याने झाकून घेतले होते. अंगावर पांढऱ्या रंगाचा नाईट सूट परिधान केले असल्याचा सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. चोरटे आजूबाजूच्या दुकानातमध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये दुचाकी वरून जात आसल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा :Action Against Illegal Gutkha : इंदापूर पोलिसांची अवैध गुटख्यावर कारवाई; 93 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

ABOUT THE AUTHOR

...view details