Pune Mobile Theft : पुण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, एका वर्षात पुणेकरांचे २९ हजारांपेक्षा जास्त मोबाईल चोरीला - Pune Police Lost And Found
पुण्यात मोबाईल चोरांवर पोलिसांचा अंकुश राहिलेला दिसून येत नाही. एका वर्षात पुणेकरांचे तब्बल २९ हजार मोबाईल्स चोरीला गेले ( Pune Mobile Theft Cases Increased ) आहेत. मोबाईल चोरांच्या टोळ्यांनी पुण्यात अक्षरशः धुमाकूळच घातल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते.
पुणे पोलिस
पुणे - पुण्यात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ( Pune Mobile Theft Cases Increased ) मोठ्या प्रमाणत वाढ झालेली दिसत आहे. गेल्या एका वर्षात पुण्यात तब्बल २९ हजार ५१५ मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यापैकी फक्त ४९९ मोबाईल सापडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी वाढली आहे. मागील वर्षी २२ हजार ९४३ मोबाईल्स चोरीला गेले होते.