पुणे -गुढीपाडव्यादिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासमोर लाऊडस्पीकर ( Raj Thackeray Statement Ajan ) लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीनंतर पक्षात धुसफूस वाढली असतानाच वसंत मोरे यांनी मनसे पुणे शहर अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले ( MNS Vasant More Removed President ) आहे. मनसेचे माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे पुणे शहर अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली ( Sainath Baba New President ) आहे. त्यात आता 'मी मनसैनिक म्हणून काम करणार आहे,' अशी भूमिका वसंत मोरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केली आहे.
वसंत मोरे म्हणाले की, मला याची कल्पना नव्हता. जे झाले ते अचानक झालेले आहे. मला प्रत्येक पक्षाची ऑफर आली आहे. मात्र, मनसैनिक म्हणून काम करणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
साईनाथ बाबर यांची नियुक्ती -
पुण्यातील नाराजी नाट्यानंतर राज ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या वसंत मोरेंना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर वसंत मोरेंची पुणे मनसे शहरअध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र राज ठाकरेंनी दिले आहे.