पुणे- अयोध्याबाबतचा निर्णय आल्यानंतर एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना हा निर्णय ऐकून मनापासून आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता - राज ठाकरे - राज ठाकरे न्यूज
आता राम मंदिर लवकरात लवकर बनवावे आणि रामराज्यही आणावे, कारण सध्या जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरे
हेही वाचा -वादग्रस्त जमीन रामल्लाचीच; मुस्लीम पक्षकारांना पर्यायी जागा मिळणार
आज अतिशय आनंद झाला, इतक्या वर्षाची प्रतिक्षा आज संपली. या सर्व संघर्षात ज्या कारसेवकांनी बलिदान दिले ते आज सार्थकी झाले. आता राम मंदिर लवकरात लवकर बनवावे आणि रामराज्यही आणावे, कारण सध्या जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ते पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.