महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महागाई कमी करा.. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन, मनसेची पुण्यात निदर्शने

भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असतानाही सरकारला त्यावर नियंत्रण ठेवणे जमले नाही. ठाकरे सरकारने आजपर्यंत महागाईच्या विषयावर एकदाही बैठक घेतली नाही. त्यामुळे महागाई कमी करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा वाढत्या महागाई विरोधात मनसेने राज्य सरकारला दिला आहे.

महागाई कमी करा.. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन
महागाई कमी करा.. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

By

Published : Oct 29, 2020, 1:43 PM IST

पुणे- दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, भाज्यांचे कडाडलेले दर, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव, या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाविकाल आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करत पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शहरातील अलका चौकात केलेल्या या आंदोलनावेळी मनसैनिकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन,

सरकार गाढ झोपलेय-

यावेळी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असतानाही सरकारला त्यावर नियंत्रण ठेवणे जमले नाही. ठाकरे सरकारने आजपर्यंत महागाईच्या विषयावर एकदाही बैठक घेतली नाही. तसेच जिल्हाधिकारी अथवा संबंधित अधिकाऱ्यांना महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याचे कोणतेही निर्देशही दिले नाहीत. त्यामुळे गाढ झोपेत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी मनसेच्या वतीने आज ही निदर्शने करण्यात आली.

आमची दिवाळी कडू होणार असेल तर सरकारची दिवाळीही कडूच होईल. सरकारला समजेल अशा भाषेत आम्ही त्यांना यापुढे उत्तर देऊ. पुढील काळात जर महागाई कमी नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही अजय शिंदे यांनी यावेळी दिला आहे.

महागाईचा भडका-

राज्यात मागील १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. परिणामी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव जवळपास ३० ते ३५ टक्क्यांनी महागले आहेत. कांदा दर तर प्रती किलो १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच दैनदिन भाजीपालाही महागला आहे. या महागाईची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक होत सरकारवर निशाणा साधत आंदोलन सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details