पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द ( Raj Thackeray Pune Sabha Canceled ) झाली आहे. अशा आशयाचे पत्र पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंची सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच होणार आहे. त्याबाबत राज ठाकरे स्वतः उद्या गुरूवारी स्पष्टीकरण देतील. पण पुण्यातली सभा होणारच अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी व्यक्त केली आहे.
या कारणाने सभा रद्द - मनसे कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेतली असता सध्या तरी पावसाचे कारण देत नदीपात्रात होणारी सभा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष - राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र पावसामुळे ही सभा सद्धा रद्द करण्यात आली आहे. मागच्या तीन सभेत राज ठाकरेंनी मशिदी वरच्या भोंग्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर मनसेने राज्यभर आंदोलन देखील केले या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत राज ठाकरे काय बोलणार आणि आपल्या सभेतून विरोधकांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.