पुणे पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे MNS leader Amit Thackeray हे आज महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद MNS leader Amit Thackeray Visits Pune साधत आहेत. पत्रकार भवन कार्यालयामध्ये ते संवाद साधत आहेत. यावेळी बोलताना मनसेचे प्रवक्ते गजानन काळे MNS spokesperson Gajanan Kale यांनी मात्र पत्रकारांशी संवाद साधला आहे. शिवसेनासुद्धा नवाब सेना आहे, अशी टीका गजानन काळे यांनी शिवसेनेवर Gajanan Kale Criticized Shiv Sena केलेली आहे. ज्या एमआयएमच्या मतावर तुमचा विरोधी पक्ष नेता होतो. त्या एमआयएमच्या मतावर तुम्ही राज्यसभेत मतदान घेता त्यात तुमचे हिंदुत्व कसले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केलेली आहे.
आदित्य ठाकरेंवर टीका मनसेचे प्रदेश प्रवक्ते गजानन काळे यांनी ई-टीव्हीशी बोलताना शिवसेनेचे हिंदुत्व संपलेले आहे. शिवसेनाही बकाल झालेली सेना आहे, असे यावेळी म्हटले आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित ठाकरे यांचा दौरा हा आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या आधी सुरू झालेला आहे. ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कोणीही असे म्हणू नका की आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अमित ठाकरे जातात. आमचा नेता हा सामान्यांचे प्रश्न घेऊन लढत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. यासाठी आम्ही काम जास्त करीत आहे. त्यामुळे आम्ही लोकांसाठी काम करतो, असेही यावेळी गजानन काळे म्हणाले.