पुणे -राज ठाकरे यांची शनिवारी(2 एप्रिल)रोजी मुंबईत शिवाजी पार्कमध्ये गुडी पाडव्यानिमीत्त सभा झाली. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वक्तव्य केले आहे. (The issue of bells on the mosque) त्यानंतर महाराष्ट्रभर त्या वक्तव्याचे उलट-सुलट परिणाम दिसून आले आहेत. महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात त्या वाक्याची चर्चा सुरू आहे. आता या मुद्द्यावरुन पुण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दुप्पट पटीने स्पीकर लावू - पुणे शहर मनसेने शहरातील पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे. डेक्कन परिसरातील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने हे पत्र दिले आहे. डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलीस स्टेशनला हे पत्र दिले आहे. दरम्यान, 4 दिवसांचा अल्टिमेटही दिला आहे. तसेच, भोंगे जर काढले नाहीत तर दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसा वाचली जाईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.