पुणे -मनसेचा 16 वा वर्धापन दिन हा पुण्यात साजरा होत ( MNS Foundation Day In Pune ) आहे. त्यानिमित्ताने पुण्यात जोरदार तयारी सुरु आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे मनसेचा हा वर्धापन दिन साजरा होत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय ( MNS Chief Raj Thackeray ) बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे पुण्यातून पुन्हा देणार हिंदुत्वाचा संदेश
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपला 15 वा वर्धापन दिन साजरा केला नव्हता. त्यामुळे आज ( गुरुवार ) पार पडणाऱ्या वर्धापनदिनानिमित्त जोरदार तयारी पुण्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे. या मेळाव्यात महिला भगव्या साडीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे मनसे एक प्रकारे हिंदुत्वाचा संदेश यानिमित्त देणार आहे.