महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजसंवाद.. मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवारपासून तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर - मनसे प्रमुख राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. 19 ते 21 जुलै या कालावधीत ते पुणे दौरा करणार आहेत. शहरातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्ष बांधणी व आगामी महानगरपालिका निवडणुका याविषयी संवाद व प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करणार आहेत

Raj Thackeray
Raj Thackeray

By

Published : Jul 17, 2021, 5:30 PM IST

पुणे -मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. 19 ते 21 जुलै या कालावधीत ते पुणे दौरा करणार आहेत. शहरातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्ष बांधणी व आगामी महानगरपालिका निवडणुका याविषयी संवाद व प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य मनसे गटनेते राजेंद्र वागसकर यांनी दिली.

राज ठाकरेंच्या दौऱ्याची माहिती देताना मनसे गटनेते
या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. सोमवारी वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, कसबा व पर्वती विभागातील इच्छुक पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत.
यावेळी बोलताना मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे म्हणाले या संवाद दौऱ्या दरम्यान काळात सामाजिक काम करणाऱ्या अनेक संस्था कार्यकर्ते यांना भेटून त्यांना राज ठाकरेंना सन्मानित करतील. त्यांच्या या संवाद दौऱ्यादरम्यान राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेचे इच्छुक उमेदवारांशी राज ठाकरे संवाद साधतील.

ABOUT THE AUTHOR

...view details