महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray : मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का? राज ठाकरे यांची राणा दाम्पत्यावर टिका - राज ठाकरे यांची राणा दाम्पत्यावर टिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार नवनीत आणि आमदार रवी राणा यांच्यावर सडकून टीका केली ( Raj Thackeray Criticized Rana Couple ) आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) म्हणायला ती काय मशीद आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

RAJ THACKERAY
राज ठाकरे

By

Published : May 22, 2022, 1:36 PM IST

पुणे : पुण्यात आज गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा समाचार ( Raj Thackeray Criticized Rana Couple ) घेतला. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) म्हणायला ती काय मशीद आहे का?", असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली.


अन् लडाख मध्ये राणा आणि राऊतांनी सोबत जेवण केलं : पुण्यात गणेश कला क्रीडा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भोंग्यांच्या बाबतीतील पुढील आंदोलन, राणा दाम्पत्य, तसेच अयोध्या दौऱ्याला स्थिगिती या सर्वच विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. भोंग्यांच्या बाबतीत मी सांगितलं काय की जर मशीदीवरती जोरात बांग दिली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा. आणि ते राणा दाम्पत्यांने काय केलं. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा हट्ट.. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?", अशा शब्दात राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला. हे कोणी केलं आणि यानंतर लडाख ला संजय राऊत आणि राणा भेटले यावरूनच पहा हे कोणी केलं असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांची राणा दाम्पत्यावर टिका

हेही वाचा : Raj Thackeray On Uddhav Thackeray : 'अरे तू आहेस तरी कोण? सरदार पटेल की, महात्मा गांधी' राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details