पुणे :राष्ट्रावदीचे प्रमुख शरद पवार यांनी काल माध्यमांशी संवाद साधून, त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीची माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितले की, अनेक आमदारांची आज ईडीकडून चौकशी सुरू आहे. पण, 5 वर्षांपूर्वी ईडी हे नावदेखील आम्हाला माहिती नव्हते. पण, आता ईडीचे नाव खेड्यापाड्यात ही घेतले जाते. या एजन्सीजचा उपयोग हा सध्या राजकीय उद्देशाने वेगळ्या विचाराचे, विरोधक असलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी केला जातो आहे. मलादेखील इन्कम टॅक्सकडून प्रेमपत्र आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मला इन्कम टॅक्सकडून आलेल्या नोटिसा : यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून, ईडी आणि इन्कट टॅक्सकडून आलेल्या नोटीसीचा उल्लेख करताना, त्यांना मागील 25 ते 30 वर्षांपूर्वीचा लेखाजोखा मागितला असल्याचे ते म्हणालै. 2004 साली मी पार्लमेंटसाठी उभा होतो. त्यामुळे तेव्हाची सर्व डिटेल त्यांनी मागितली आहेत. याच्या चौकशीची नोटीस मला आता आली आहे. परत 2009 साली लोकसभेला जेव्हा मी उभा राहिलो त्याचीही नोटीस मला आली. त्यानंतर 2014 सालची पण मला नोटीस आली आहे. 2020 सालची नोटीसदेखील मला आता आली असल्याची माहिती यावेळी पवार यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणे भाजपच्या वरिष्ठांचा आदेश :शरद पवार यांनी शपथविधी संदर्भातसुद्धा भाष्य केले ते म्हणाले शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरीभाजपकडे तुल्यबळाने आमदार संख्या जास्त असतानाही त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. हे वाटते तितके सोपे नाही. कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पद भूषवलेली व्यक्ती आहे. त्यांना आता त्यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. हे भाजपच्या अतिवरिष्ठ लोकांचा सहभागाशिवाय घडू शकत नाही.
पक्ष हा माझाच राहिला - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( NCP chief Sharad Pawar ) यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. प्रथम त्यांनी बंड आमदारांबद्दल विधान केले, ते म्हणाले की पक्ष संघटना ही वेगळी असते आणि विधिमंडळातील पक्ष हा वेगळा असतो. पक्ष तिकीट देतो तेव्हा उमेदवार लोकांमध्ये जातो आणि मग तो उमेदवार निवडून येतो. मग तो आमदार होतो. आमदारही केवळ पाच वर्षांसाठी असतात. पण पक्ष हा कायमस्वरूपी असतो. असे म्हणत त्यांनी 1980 साली झालेल्या निवडणुकीनंतरचा किस्सादेखील यावेळी सांगितला. त्यावेळी माझ्या पक्षाचे 69 आमदारांपैकी 5 आमदार हे माझ्याबरोबर राहिले बाकी गेले. पण, पक्ष हा माझाच राहिला, असे यावेळी पवार म्हणाले.