महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rohit Pawar on Satish Uke ED Action : भाजपविरोधात बोलतात म्हणून कारवाई केली जाते - रोहित पवार - रोहित पवार सतीश उके ईडी कारवाई

वकील सतीश उके हे (Satish Uke ED Action) सातत्याने भाजपच्या नेत्यांवर आरोप करत असतात, तेही पुरव्यांनीशी. एखादी गैरव्यवहार करणारी कंपनी असेल किंवा एखादा घोटाळेबाज कोणी असेल तर त्याच्या घरी ईडी छापे टाकते. पण, एखाद्या वकिलांच्या घरी छापे टाकले म्हणजे निश्चितच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे.

mla rohit pawar
आमदार रोहित पवार

By

Published : Mar 31, 2022, 7:18 PM IST

Updated : Mar 31, 2022, 8:37 PM IST

पुणे -ज्या वकिलांच्या घरावर आज छापा पडला आहे ते वकील सतीश उके हे (Satish Uke ED Action) सातत्याने भाजपच्या नेत्यांवर आरोप करत असतात, तेही पुरव्यांनीशी. एखादी गैरव्यवहार करणारी कंपनी असेल किंवा एखादा घोटाळेबाज कोणी असेल तर त्याच्या घरी ईडी छापे टाकते. पण, एखाद्या वकिलांच्या घरी छापे टाकले म्हणजे निश्चितच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते वकील फक्त भाजपच्या विरोधात सातत्याने बोलतात म्हणून त्यांना टार्गेट केले जात आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वकील सतीश उके यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर दिली आहे.

आमदार रोहित पवार

महाविकास आघाडीत अलबेल - भाजपकडून सतत बोलले जात आहे की महाविकास आघाडीत अलबेल नाही. मात्र, हा एक भाजपचा डाव आहे. आमच्या तिन्ही पक्षांमध्ये सर्व अलबेल आहे. आम्ही एकमताने काम करत असल्याचे देखील आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

शरद पवार हे मोठे नेते - कार्यकर्ते नक्कीच भावनिक असतात. आपल्या नेत्याला एखादी जबाबदारी मिळावी असे त्यांच्या मनामध्ये असते. पण जोपर्यंत याबाबतीत एखादा मोठा नेता बोलत नाही तोपर्यंत बोलणे योग्य नाही. पण पवार साहेब हे मोठे नेते आहेत. अनेक नेते त्यांना भेटत असतात. मात्र, देशात लोकशाही टिकली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काहीतरी केले पाहिजे, असे माझे मत आहे. त्याचबरोबर जेव्हा एखादा पक्ष आणि संघटना काहीतरी निगोसिएशनसाठी एकत्र येतो त्यावेळेस देशाचे नुकसान होते हे आपण पाहिले आहे, असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.

...तर पार्थच्या प्रचारासाठी मावळमध्ये पहिल्यांदा मी जाईल -जर पार्थला उमेदवारी मिळाली तर मावळमध्ये जाऊन प्रचार करणारा राष्ट्रवादीचा पहिला कार्यकर्ता मी असेल, असे रोहित पवार म्हणाले. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात लढत झाली होती. यावेळी पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. तरीही अधूनमधून त्याचे नाव या मतदारसंघासाठी चर्चेत येत असतं.

सदाभाऊ शेतकऱ्यांच्या नावावर मोठे झाले -सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. शरद पवार यांनी राज्यभर फक्त आग लावण्याचे काम केले आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे अशी टीका खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. त्यांच्या याच टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सदाभाऊ असे बोलत आहेत म्हणजे त्यांची आमदारकी संपत आली का हे आधी आपल्याला पाहावे लागेल. त्यांनी अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, शेतकऱ्यांच्या नावावर ते मोठे झाले आणि पद मिळाले की ते शेतकऱ्यांनाच विसरले, अशी टीका रोहित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.

Last Updated : Mar 31, 2022, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details