पुणे: विधानपरिषदेचे आमदार भाजपा नेते राम शिंदे (MLA Ram Shinde Demand on Sugar Factory) यांनी बारामती ॲग्रो लिमिटेड, साखर कारखान्यावर गुन्हा दाखल (case against Baramati Agro Limited Sugar Factory) करण्याची मागणी राज्य साखर आयुक्तांकडे (MLA Ram Shinde demand to State Sugar Commissioner) मागणी केली आहे. त्याने दिलेल्या पत्रात खालील बाबी नमूद करून राज्य साखर आयुक्ताने कारखान्यावर कारवाई करावी (MLA Shinde action demand on State sugar factory) अशी मागणी केलेली आहे. हा साखर कारखाना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे.
Ram Shinde on Sugar Factory: आ. शिंदे यांची बारामती ॲग्रोवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - आमदार राम शिंदे यांची मागणी
विधानपरिषदेचे आमदार भाजपा नेते राम शिंदे (MLA Ram Shinde Demand on Sugar Factory) यांनी बारामती ॲग्रो लिमिटेड, साखर कारखान्यावर गुन्हा दाखल (case against Baramati Agro Limited Sugar Factory) करण्याची मागणी राज्य साखर आयुक्तांकडे (MLA Ram Shinde demand to State Sugar Commissioner) मागणी केली आहे. त्याने दिलेल्या पत्रात खालील बाबी नमूद करून राज्य साखर आयुक्ताने कारखान्यावर कारवाई करावी (MLA Shinde action demand on State sugar factory) अशी मागणी केलेली आहे. हा साखर कारखाना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे.
15 ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास विरोध-राज्यातील साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने जारी केले होते. या आदेशानुसार सन 2022-23 या चालू वर्षीच्या गाळप हंगाम दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झालेला आहे. जे कारखाने गाळप हंगाम दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप सुरू करतील अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या सभेत देण्यात आलेले आहेत. दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश, 1984 खंड 4 चा भंग होतो.
'त्या' साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, आ. शिंदे -तथापि, बारामती अॅगो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या साखर कारखान्याने या वर्षीचा गाळप हंगाम दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी सुरू करून कायद्याचा भंग केलेला आहे. आज सोमवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी या कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती अॅग्रो लिमिटेड, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी केली आहे.