पुणे -आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या अनेक गरीब व गरजू रुग्णांवर धर्मादाय कोट्यातून उपचार करण्यास नामांकित रुग्णालये टाळाटाळ करत आहेत. असाच प्रकार पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (Sahyadri Hospital Pune) घडला आहे. त्यांनी रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम केले आहे. माळशिरस मतदारसंघातील एका गरीब रुग्णाचा हॉस्पिटलने उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांनी अधिवेशनात केली. तर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल हे हॉस्पिटल नसून, कसाईखाना आहे, असा आरोप देखील आज आमदार राम सातपुते यांनी केला आहे. माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यावर आज त्यांनी धर्मादाय आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
Ram Satpute on Sahyadri Hospital : पुण्यातील सह्याद्री हे हॉस्पिटल आहे की कसाईखाना? - आमदार राम सातपुते - सह्याद्री हॉस्पिटल पुणे बातमी
माळशिरस मतदारसंघातील एका गरीब रुग्णाचा सह्याद्री हॉस्पिटलने (Sahyadri Hospital Pune) उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांनी अधिवेशनात केली. तर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल हे हॉस्पिटल नसून, कसाईखाना आहे, असा आरोप देखील आज आमदार राम सातपुते यांनी केला आहे.
राम सातपुते यांचा सह्याद्री हॉस्पिटलवर आरोप : भाजपाचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी गरीब व गरजु रुग्णांवर उपचार करताना मोठी हॉस्पिटल कशा प्रकारे टाळाटाळ करतात आणि त्यातून या रुग्णांचा जीव कसा जातो यावर भाष्य केले. मोठमोठी हॉस्पिटल सरकारी भूखंड घेऊन बांधली गेली आहेत. त्याठिकाणी गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांच्या सूचना आहेत. नियमावली आहे. मात्र, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये धर्मादाय कोट्यातून गोरगरीबांचे उपचार होत नाहीत. ही हॉस्पिटल कोणालाही जुमानत नाहीत. गरीब व गरजू रुग्णांचे उपचारच हे करत नाही. अशा या हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी देखील सातपुते यांनी यावेळी केली.
नामवंत हॉस्पिटलमध्ये एजंटचा सुळसुळाट : सह्याद्री हॉस्पिटलसंदर्भात सहा महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती. परंतु, त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. अशा नामवंत हॉस्पिटलमध्ये एजंटचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप करत तातडीने आरोग्यमंत्री, धर्मादाय आयुक्त आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक लावण्याची मागणी आमदार सातपुते यांनी केली. तसेच भविष्यात आमदारांची कमिटी घेऊन अध्यक्षांना भेटणार आहे, असे देखील यावेळी सातपुते म्हणाले.