पुणे -लोणावळ्यातील नागफणी पॉईंट परिसरातील जंगलात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. फरहान शहा अस 24 वर्षीय तरुणाच नाव आहे. मूळ दिल्लीत राहणारा फरहान शुक्रवारी पुण्यात आला होता. लोणावळा परिसरात फिरण्यासाठी एकटाच गेला. नागफणी पॉईंट येथून खाली उतरत असताना रस्ता चुकला. याबाबत भावाला फोन करून माहिती दिली होती. कुटुंबियांनी तत्काळ लोणावळा शहर पोलिसांना माहिती देऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. फरहानचा फोन ही बंद झाल्याने पोलीस त्याच्या पर्यंत पोहचू शकले नाहीत. 400 फुट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळला आहे.
Lonavala Dead Body Found : लोणावळ्यातील जंगलात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह; 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू - लोणावळा तरुणाचा मृतदेह सापडला
लोणावळ्यातील नागफणी पॉईंट परिसरातील ( Nagfani Point Dead Body Found ) जंगलात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. फरहान शहा अस 24 वर्षीय तरुणाच नाव ( Farhan Shaha Death ) आहे. मूळ दिल्लीत राहणारा फरहान शुक्रवारी पुण्यात आला होता.

फरहान शहा हा अभियंता असून रोबोट तयार करण्याच्या कंपनीत काम करायचा. शुक्रवारी तो पुण्यात आला होता. तो त्याच दिवशी दिल्लीला परत जाणार होता. परंतु, त्याची फ्लाईट रद्द झाली. मग, तो लोणावळ्यात आला होता. तिथून तो एकटाच नागफणी पॉईंट येथे गेला. परतत असताना असताना तो रस्ता चुकला, याबाबत त्याने भावाला फोन करून रस्ता चुकलो असून मोबाईलची बॅटरी लो आहे. 3- 4 तासांनी माझाशी संपर्क झाला नाही, तर नागफणी पॉईंट येथे मदत पाठव अस सांगितलं. तस दोघांच मोबाईल रेकॉर्डिंग पुढे आलं आहे. याबाबत तत्काळ लोणावळा शहर पोलिसांना कळवण्यात आलं, तो बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांसह शिवदुर्ग रेस्क्यू टीम, डॉग स्कॉड, कुरवंडे ग्रास्थ त्याचा शोध घेत होते. आज INS शिवाजी परिसरात दरीतून दुर्गंन्ध येत असल्याने NDRF च पथक दरीत उतरल, तो फरहानचा मृतदेह असल्याचा निष्पन्न झालं.