पुणे - देशाच्या राजकारणात बदल करण्याच्या उद्देशाने केंद्रातील भाजपा ( BJP ) सरकारवर ताशेरे ओढणारे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर ( Telangana Chief Minister KCR ) मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Chief Minister Uddhav Thackeray and NCP President Sharad Pawar ) यांच्या भेटीसाठी ते मुंबईत आले आहे. प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा अधिकार आहे. तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढे काम केले आहे, की 2024 मध्ये पुन्हा एकदा एनडीएचा झेंडा संसदेत फडकणार आहे. अशा भेटीगाठी होत असतात आणि याचा नुकसान आम्हांला होणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale ) यांनी दिली आहे. ते आज (रविवारी) पुण्यात बोलत होते.
- 'चंद्रशेखर राव यांना समुद्रात बुडावल्या शिवाय राहणार नाही'
आमच्या विरोधात जे आहे ते एकत्र नसले तरी ते विरोधक आहे आणि एकत्र आले तरी विरोधकच आहे. त्यांना काही भूमिका मांडायची आहे ती भूमिका त्यांनी मांडावी. आम्हाला काहीही फरक पडत नाही. चंद्रशेखर राव हे उलट सुलट बोलणारे मुख्यमंत्री आहे. ते जर भाजपा बंगालच्या खाडीत टाकणार असेल तर आम्ही त्यांना कन्या कुमारी येथील समुद्रात बुडावल्या शिवाय राहणार नाही, असे देखील यावेळी आठवले म्हणाले.
- 'दोस्त दोस्त ना राहा, दुश्मन दोस्त झाला'