महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पार्थ पवार हे माझे मित्र.. राजेश टोपेंंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया - राजेश टोपे लेटेस्ट न्यूज

जास्तीचे बील आकारणार्‍या रुग्णालयावर आयुक्त, जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. एखाद्या रुग्णालयाने 100 रुपये जास्त घेतले, तर त्यांच्याकडून 500 रुपये वसूल करून गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

pune
राजेश टोपे

By

Published : Aug 21, 2020, 4:00 PM IST

पुणे - कोरोनाच्या काळात रुग्णाकडून भरमसाठ बील वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. जास्तीचे बील आकारणार्‍या रुग्णालयावर आयुक्त, जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. एखाद्या रुग्णालयाने 100 रुपये जास्त घेतले, तर त्यांच्याकडून 500 रुपये वसूल करून गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

पुण्यात एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

राजेश टोपे म्हणाले, पुण्यात सध्या वाढणारा कोरोना काही दिवसात खाली येईल. सद्यस्थितीत पुण्यात बेडची अडचण नाही. जम्बो हॉस्पिटल लवकरच तयार होत आहे. ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड वाढणार आहेत. त्यामुळे पुण्यावरील कोरोनाचे संकट काही दिवसात कमी होईल अशी आशाही राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

पवार कुटुंब हे आदर्शवत पार्थ पवार हे माझे मित्र असून पवार परिवार आदर्शवत परिवार आहे. सध्या निर्माण झालेला वाद हा तात्पुरता विषय आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details