महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मी सुद्धा गणेशोत्सवात दहा दिवस पायी फिरून पुण्यातील गणपतीचे दर्शन घ्यायचो' - राजेश टोपे लेटेस्ट न्यूज इन पुणे

उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे. आगमनाची मिरवणूक न काढता आठ ते दहा लोकांनी मिळून बाप्पांची प्राणप्रतिष्ठापणा करावी. पूजा करताना सुद्धा सोशल डिस्टंसिंग पाळून केवळ पाच लोकांनी उपस्थित रहावे. प्रत्येकाने घराघरात श्रद्धेने गणपती बसवावा असे आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी केले.

rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Aug 21, 2020, 8:34 PM IST

पुणे - शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी पुण्यामधूनच इंजीनियरिंग केलेला कार्यकर्ता आहे. त्यावेळी मी गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पायी फिरून पुण्याच्या सगळ्या गणपतीचे दर्शन घेत असायचो. गणेशोत्सवात गर्दीत फिरून देखावे पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. पण यावर्षी हा सर्व आनंद आपण बाजूला ठेवूया आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

राजेश टोपे म्हणाले, यंदाचे वर्ष हे कोरोनाचे वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी गणेशभक्तांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा.

उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे. अत्यंत साधेपणाने आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. आगमनाची मिरवणूक न काढता आठ ते दहा लोकांनी मिळून बाप्पांची प्राणप्रतिष्ठापणा करावी. पूजा करताना सुद्धा सोशल डिस्टंसिंग पाळून केवळ पाच लोकांनी उपस्थित रहावे. प्रत्येकाने घराघरात श्रद्धेने गणपती बसवावा. यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने आपल्या श्रद्धेवर, भावनांवर आवर घालून राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी विनंतीही टोपे यांनी गणेशभक्तांना केली.

ABOUT THE AUTHOR

...view details