पुणे -चीनच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर केंद्र सरकारलर टीका होताना दिसत आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार कुठेही आक्रमण झालं असे म्हणायला तयार नाही. आपली जमीन त्यांनी घेतली असे म्हणयलाही तयार नाही. मग 20 सैनिक मारले कसे? असा सवाल करत याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवं असे आव्हाड म्हणाले.
काहीच नाही झालं.. मग 20 सैनिक मारले कसे, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल - pune latest news
चीनच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर केंद्र सरकारलर टीका होताना दिसत आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
1967 नंतर आजपर्यंत एकदाही चीनच्या बॉर्डरवर प्राणघातक हल्ला झालेला नाही. कुठल्याही सैनिकाने प्राण गमावला नाही. या हल्ल्याची जबाबदारी कोणीतरी स्विकारायला हवी, सगळ्यांनीच हात वर केले तर याचे उत्तर चीफ ऑफ डिफेन्स किंवा संरक्षणमंत्री किंवा पंतप्रधान यांनी द्यायला हवं असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.
पुणे येथाल झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालय येथे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टांच्या समस्यांबाबत गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड बैठक आयोजित केली होती. यावेळी झोपडपट्टांच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.