महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंगळागौरी, विटीदांडूला मान्यता मिळाल्यास तेही आरक्षणाच्या कक्षेत येईल, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - मंगळागौरी खेळ आरक्षण चंद्रकांत पाटील

मंगळागौरी हा खेळ जर Minister Chandrakant Patil on govinda reservation कोणी खेळात जोडला तर काही ऑब्जेक्शनच नसेल. माझे म्हणणे तर आहे की विटीदांडूही घ्या. जे भारतीय खेळ हे दुर्मिळ govinda reservation in jobs होत चालले आहे ते घ्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Minister Chandrakant Patil on govinda reservation
मंगळागौरी खेळ आरक्षण चंद्रकांत पाटील

By

Published : Aug 20, 2022, 12:22 PM IST

पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा Minister Chandrakant Patil on govinda reservation असलेल्या दहिहंडीच्या (गोविंदा) प्रो गोविंदा स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे govinda reservation in jobs यांनी विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षfसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणे नंतर विरोधकांसह विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील यावर आक्षेप घेत सरकारवर टिका केली आहे. मंगळागौरीला देखील मान्यता देण्यात यावी, अशी मागणी काही जण करत आहे. यावर आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की मागणी करावी, वैध असेल तर जोडायला काहीही हरकत नाही. मंगळागौरी हा खेळ जर कोणी खेळात जोडला तर काही ऑब्जेक्शनच नसेल. माझे म्हणणे तर आहे की विटीदांडूही घ्या. जे भारतीय खेळ हे दुर्मिळ होत चालले आहे ते घ्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

माहिती देताना मंत्री चंद्रकांत पाटील

हेही वाचाGuruji Talim Mandal dahi handi भोईराज संघाने फोडली तिसरा गुरुजी तालीम मंडळासह भाऊ रंगारी गणपती मंडळाची दहीहंडी

शिंदे सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री मिळाल्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आले. पाटील पुढे म्हणाले की, खेळाडूंसाठीच्या 5 टक्के नोकरीच्या आरक्षणामध्ये दहीहंडी हा खेळ जोडण्यात आला आहे. हे आरक्षण नव्याने देण्यात आलेले नाही. उद्या जर कोणी म्हटले की विटीदांडू हा खेळ जोडा तर हा खेळही जोडला जाऊ शकतो. इतके सोपे असताना समाजाची दिशाभूल करण्याचे काम काही लोक करत आहे, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

आपल्याकडे सध्या एखाद्या गोष्टीचे अभ्यास करण्यापूर्वीच त्यावर बोलले जाते. यापूर्वी महाराष्ट्रात क्रीडासाठी 5 टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण हे आहेच. दोन आरक्षण हे असतात एक तर उभ आणि दुसरे अडवा आरक्षण. उभे आरक्षण हे देताच येत नाही. कारण उभे आरक्षण हे 50 टक्केच्या वर जाता येत नाही. त्यामुळे खेळातील जो 5 टक्के आरक्षण आहे त्या 5 टक्के अस्तित्वात असलेल्या खेळाडूंसाठीच्या नोकरीच्या आरक्षणामध्ये दहीहंडी हा खेळ जोडण्यात आला आहे. हे आरक्षण नव्याने देण्यात आलेले नाही तर आहे त्याच आरक्षणमध्ये हा नवीन खेळ जोडण्यात आला आहे. त्यात एवढा आरडा ओरडा करण्याची काय गरज आहे, असे देखील यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी पाटील यांना फडणवीस यांच्या पुणे लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आल तेव्हा ते म्हणाले की, या देशात प्रत्येकाला आपले म्हणणे मांडायचा अधिकार आहे. परंतु, देवेंद्रजी हे अशा प्रकरच्या जातीपातीच्या वर आलेले आहे. ते एक कर्तृत्ववान नेते आहे. त्यांचा विचार हा नेहमीच त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारे झालेला आहे. त्यामुळे मागणी कोणीही करू शकतो, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचाAmrita Fadnavis on Devendra Fadnavis in Pune देवेंद्रजींना महाराष्ट्रातच काम करायला आवडेल, पुण्याचे पालकमंत्री पदालासुद्धा पसंती, अमृता फडणवीस

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details