पुणे- राज्यसभेची निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप महाविकास आघाडी करत आहे, अशी टिका भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. यावर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की जस तुम्ही खूप दिवस काम करुन थकल्यांनंतर एकत्रितपणे फिरायला जाता आणि परिवार म्हणून एकत्र येतात, गप्पा मारतात. विचारांची देवाण घेवाण होते. कोणाचे समज गैरसमज असतील तर ते दूर केले जातात तस ते आहे.
आमदारांना नजरकैद नव्हे तर ती ट्रीप - अजित पवार - MLA Trip
अमक्याचा मुख्यमंत्री, तमक्याचा मुख्यमंत्री कशसाठी नवीन प्रश्न तयार करत आहात. सध्या आम्ही गुण्यागोविंद्याने नांदत आहोत चांगल चालले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार, या वक्तव्याकर दिली.
![आमदारांना नजरकैद नव्हे तर ती ट्रीप - अजित पवार अजित पवार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15481643-1054-15481643-1654443460733.jpg)
अजित पवार
बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यात विधानभवन येथे आषाढी वारी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मला त्या गोष्टीला अजिबात महत्त्व द्यायचे नाही. सध्या व्यवस्थित चालला आहे. अमक्याचा मुख्यमंत्री, तमक्याचा मुख्यमंत्री कशसाठी नवीन प्रश्न तयार करत आहात. सध्या आम्ही गुण्यागोविंद्याने नांदत आहोत चांगल चालले आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.