महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde on Uday samant : गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना ( Eknath Shinde on Uday samant ) आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Uday samant car attacked in pune ) यांनी प्रतिक्रिया दिली. गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही, असे ते म्हणाले.

Etv BharaEknath Shinde on Uday samantt
उदय सामंत यांच्या कारवर पुणे येथे हल्ला

By

Published : Aug 3, 2022, 7:09 AM IST

पुणे - काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर ( Eknath Shinde on Uday samant ) अज्ञातांनी दगडफेक केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. गाडीवर दगड मारून पळून ( Uday samant car attacked in pune ) जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा सुव्यवस्थेचे पालन करायचे काम हे सरकार आणि पोलिसांचे आहे. त्यामुळे, ज्यांनी हे काम केले आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी गणेशोत्सवाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा -Attack on Uday Samant Vehicle : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा कात्रज चौकात हल्ला, गाडीची तोडफोड

आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काय झाले याबाबत मला माहित नाही. पोलिसांना मी याबाबत सूचना दिल्या आहेत. कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे काम हे सर्वांनी केले पाहिजे. कोणीही जर चिथावणीखोर भाषण देत असेल तर पोलीस कायदेशीर काम करतील, असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हिंगोली येथील शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी चिथावणी खोर वक्तव्य केले होते. त्यावर कोणी जर चिथावणी खोर भाषण केले असेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई करतील. हे राज्य सामान्य नागरिकांचे आहे. त्यामुळे जर कोणी असे विधान करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.

सहनशीलतेचा अंत पाहू नका -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना हडपसर येथील कार्यक्रम केल्याने ( Attack on uday samant car in katraj in pune ) त्यांच्या सोबत असलेले राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर कात्रज ( Uday samant car attacked pune) येथे काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे आम्ही कोणीही एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पळून जाणार नाही, घाबरणार नाही. त्यामुळे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा सामंत यांनी हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील सूत्रधारांना दिले.

कारवर चढून हल्ल्याचा प्रयत्न - उदय सामंत :माझी कार ही कात्रज येथील सिग्नलला थांबली होती. त्यावेळी माझ्या बाजूला एक गाडी थांबली आणि त्यातून दोन जण उतरले. त्यांच्या हातात बेसबॉलची बॅट होती तर दुसऱ्याने हाताला दगड बांधला होता. त्यांनी मला शिव्या देण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आलेल्या काहींच्या हातात सळ्या होत्या. या लोकांनी कारवर चढून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. असा भ्याड हल्ला करून आमचे लोक एकनाथ शिंदेंना सोडून पळून जातील असे वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. उलट हल्ल्याने आम्ही अधिकच जवळ आलो आहोत. असले भ्याड हल्ल्यांना घाबरणारा नाही, असे उदय सामंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी कोणावर टीका करत नाही म्हणून आमच्या सहनशीलतेचा अंत कोणी बघू नये. या हल्ल्याने दाखवून दिले की राज्यातील राजकारण किती हीन आणि खालच्या पातळीला चालले आहे.

हेही वाचा -CM Eknath Shinde : ...अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारली जोरदार किक; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details